आजकाल एकत्र कुटंबपद्धती जशी कमी होत चालली आहे त्याचप्रमाणे, खेड्यात राहणारी लोकं फार मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी / शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्याने, घरं रीती होऊ लागली आहेत. अशावेळी दिवाळी कुटुंब एकत्र आणून कशी सुख आणते, अशा आशयाचं हे आईचं/ आजीचं मनोगत!
येतील पाखरे घराच्या ओढीनं, दिवाळी साजरी कराया
रितं माझं घर सारं, बघ येतील नंदनवन कराया
पाखरांना भरवेन, मी घास गं मायेचा
मिळेल ऊब, डोक्यावर हात गं मायेचा
हसतील बागडतील, माझी लेकरं घरभर
काय सांगू, कशी सांगू, किती आनंदेल माझं उरं
भरलं गोकूळ हेच सुख, घेऊन येते गं दिवाळी
लेकरांच सुख भरभरून, बघ देते ही दिवाळी
रितेपणाचा अंधार, दूर करते ही दिवाळी
खरं सांगू फक्त म्हणून, मज आवडते ही दिवाळी
–पल्लवी


Posted by मन राव on ऑक्टोबर 26, 2010 at १०:४० pm
मस्त
Posted by pallavikelkar on ऑक्टोबर 27, 2010 at १०:४० सकाळी
धन्यवाद! ब्लॉगवर स्वागत.
Posted by sushrut bidwai on ऑक्टोबर 28, 2010 at १०:४० pm
Pallavi – its a wonderful poem.
Posted by pallavikelkar on ऑक्टोबर 28, 2010 at १०:४० pm
Thanks Sushrut!
Posted by देवेंद्र चुरी on नोव्हेंबर 2, 2010 at १०:४० सकाळी
खर आहे आपल, आजकाल पोटापाण्यासाठी बरयाच लो्कांना परगावी राहाव लागत,त्यात इतर कोणत्या सणांना नक्की नाही पण दिवाळीला अगदी आवर्जुन गावी जाण होत.दिवाळीला येणारया त्या माणसांची वाट पाहणारया आई/आजीचे भावविश्व छान सादर केलत कवितेतुन…..
Posted by pallavikelkar on नोव्हेंबर 2, 2010 at १०:४० सकाळी
अगदी खरं आहे.
Posted by Mahendra on नोव्हेंबर 2, 2010 at १०:४० pm
kavita kartana man akasha evdhe asayala have
kavita vachtana matra te mungi evdhe vhave
khoop chhan kavita karata tumhi
Posted by pallavikelkar on नोव्हेंबर 2, 2010 at १०:४० pm
खरं आहे.. धन्यवाद!