चूक

अहो  चुका की बिनधास्त
चुकाल तर सुधाराल
चुकाल याची भीती असेल
तर खूप गोष्टींना मुकाल

चुकले दुसरे की हसता ना
मग त्यांनाही हसायची संधी द्या
चुकांवर पांघरुण घालू नका
नवीन चुकांना संधी द्या

मोठ्यांसमोर चुकलो आपण
त्यात लाज कसली?
त्यांनाही ठाऊक आहे
इतिहासाची पुनरावृत्ती झाली

चूक करून ओशाळण्यातही
फार मोठी गंमत असते
चुकांची कबुली देतानाही
मैफल छान रंगत असते

एक बोट दुस-याला दाखवताना
बाकीची तीन आपल्याकडे असतात
हे ठाऊक असतानाही
माणसे स्वतःला का फसवतात ?

–पल्लवी केळकर

Advertisements

13 responses to this post.

 1. अगदी छान!!! कित्येक दिवसा नंतर मी मराठी कविता वाचतोय… खूपच आवडली

  उत्तर

 2. Pallavi… this is really good.

  उत्तर

 3. HIIIiiiii
  pallu

  mast kavita sunder lihili aahes

  चूक करून ओशाळण्यातही
  फार मोठी गंमत असते
  चुकांची कबुली देतानाही
  मैफल छान रंगत असते

  he saglyat chan
  kahrech agadi asech hote

  उत्तर

 4. ह्म्म्म
  छान!

  उत्तर

 5. Hi
  ultimate!!!!!!!!!!
  keep writing……….

  उत्तर

 6. मला कशाला सांगता ?
  चुकताय ? बिनधास्त !
  मनी आणु नका काही
  तुम्ही आहातच रास्त ॥

  चुकुन जरी कराल
  तरी करून सुटाल
  चुकांना तर ठोकाल
  कायमचेच मिटाल ॥

  सुरेश पेठे

  उत्तर

 7. “आयुष्य़ाच्या रस्त्यात,
  प्रत्येकाकडून चुका नेहमी होतात,
  पण जे त्यांपासून काही शिकतात,
  नेहमी तेच पुढे जातात…”

  ग्रेट कविता…

  विशल्या!

  उत्तर

 8. खुप छान . अतीशय सुंदर . आता चूक करताना कधी घाबरणार नाही.

  उत्तर

 9. Posted by वसंत चव्हाण on जून 4, 2012 at १०:४० pm

  पल्लवीजी खुपच छान अर्थपुर्ण आणि प्रेरणादाई कविता आहे.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: