दिवाळी

आजकाल एकत्र कुटंबपद्धती जशी कमी होत चालली आहे त्याचप्रमाणे, खेड्यात राहणारी लोकं फार मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी / शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्याने, घरं रीती होऊ लागली आहेत. अशावेळी दिवाळी कुटुंब एकत्र आणून कशी सुख आणते, अशा आशयाचं हे आईचं/ आजीचं मनोगत!

येतील पाखरे घराच्या ओढीनं, दिवाळी साजरी कराया
रितं माझं घर सारं, बघ येतील नंदनवन कराया

पाखरांना भरवेन, मी घास गं मायेचा
मिळेल ऊब, डोक्यावर हात गं मायेचा

हसतील बागडतील, माझी लेकरं घरभर
काय सांगू, कशी सांगू, किती आनंदेल माझं उरं

भरलं गोकूळ हेच सुख, घेऊन येते गं दिवाळी
लेकरांच सुख भरभरून, बघ देते ही दिवाळी

रितेपणाचा अंधार, दूर करते ही दिवाळी
खरं सांगू फक्त म्हणून, मज आवडते ही दिवाळी

–पल्लवी

Advertisements

8 responses to this post.

 1. मस्त

  उत्तर

 2. खर आहे आपल, आजकाल पोटापाण्यासाठी बरयाच लो्कांना परगावी राहाव लागत,त्यात इतर कोणत्या सणांना नक्की नाही पण दिवाळीला अगदी आवर्जुन गावी जाण होत.दिवाळीला येणारया त्या माणसांची वाट पाहणारया आई/आजीचे भावविश्व छान सादर केलत कवितेतुन…..

  उत्तर

 3. kavita kartana man akasha evdhe asayala have
  kavita vachtana matra te mungi evdhe vhave
  khoop chhan kavita karata tumhi

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: