काटेरी मुकुट

ही कविता अगदी सार्‍यांची आहे, प्रातिनिधिक आहे. आईची, आजीची, बायकोची, बहिणीची मने असेच काही सांगत असतील.थोडा विचार केला तर पटेल हे, आपले अखंद ऐकून घेणारी आई/ आजी/ बहीण/ बायको कधी त्यांचे काही म्हणणे असेल हे विसरले जाते ते कळतही नाही! त्यांचेच हे मनोगत..

 • चालले तुमच्यासवे परी एकटी मी, जाणून घ्या

  सार्‍यांशी जरी नाते माझे, स्वतंत्र मी जाणून घ्या

 • मी सुखाची आदर्श प्रतिमा, दु:ख माझे मजसवे

  मी घेतला वसा आनंदाचा, अदृश्य माझी आसवे

 • आधारस्तंभालाही कधी एकटेसे वाटत असेल

  अव्यक्त सार्‍या भावनांचा कल्लोळही माजत असेल

 • आधार घेणे ठाऊक सर्वा, तयाचा कोणा विचार?

  दोष कोणाचाच नाही, कर्तव्याचा हा अविष्कार

 • दात्यावे द्यावे सारे निमुटपणे, व्यक्त न व्हावे

  अन घेणार्‍याचे सारे गार्‍हाणे शांतपणे ऐकून घ्यावे

 • मोठेपण काटेरी मुकुट, भारी अवघड भासे

  पुढला दिसतो मार्ग, परतीचा रस्ता न दिसे

  –पल्लवी

  Advertisements

  5 responses to this post.

  1. स्त्रिची अबोल व्यथा छान मांडली आहे.
   अभिनंदन………..!!!

   उत्तर

  2. तुम्ही खरच धाडसी कवयीत्री वाटता. ही कविता प्रातिनिधीक कविता आहे जी मराठी साहित्याची सद्यस्थिती दर्शविते.

   उत्तर

  3. मनाचे आक्रंदन छान पोहोचलय, प्रत्येक घरी थोड्या फार फरकाने हेच असते. सुरेख काव्य…

   उत्तर

  4. khup sundar prayatna aahe, karat raha shabdana ajun vajan yeil

   उत्तर

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  Fill in your details below or click an icon to log in:

  WordPress.com Logo

  You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

  Google+ photo

  You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

  Twitter picture

  You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

  Facebook photo

  You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

  w

  Connecting to %s

  %d bloggers like this: