Posts Tagged ‘कविता’

चूक

अहो  चुका की बिनधास्त
चुकाल तर सुधाराल
चुकाल याची भीती असेल
तर खूप गोष्टींना मुकाल

चुकले दुसरे की हसता ना
मग त्यांनाही हसायची संधी द्या
चुकांवर पांघरुण घालू नका
नवीन चुकांना संधी द्या

मोठ्यांसमोर चुकलो आपण
त्यात लाज कसली?
त्यांनाही ठाऊक आहे
इतिहासाची पुनरावृत्ती झाली

चूक करून ओशाळण्यातही
फार मोठी गंमत असते
चुकांची कबुली देतानाही
मैफल छान रंगत असते

एक बोट दुस-याला दाखवताना
बाकीची तीन आपल्याकडे असतात
हे ठाऊक असतानाही
माणसे स्वतःला का फसवतात ?

–पल्लवी केळकर

Advertisements